श्री बेणी सर व सर्व पदाधिकारी,
वसंत व्याख्यानमालेचा शताब्दी सोहळा अतिशय नियोजनाबध्द आणि भव्यदिव्य पार पाडल्याबद्द्ल सर्वांचे अभिनंदन व कौतूक.
आम्हाला ह्यात सहभागी करुन घेतल्याबद्द्ल अनेक धन्यवाद.
सौ. भाग्यश्री अनुराग केंगे
वसंत व्याख्यानमालेचा शताब्दी सोहळा खूपच चांगल्याप्रकारे पारपडला. अध्यक्ष श्रीकांत बेणी व वसंत व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मेहनत आणि अभ्यास करून देशाबाहेरील वक्ते यांना आमंत्रित करून त्याचे विचार मराठी भाषेत एकायला व सोशियल माध्यमाद्वारे पाहायला मिळाले. तसेच नाशिक जिल्ह्यातील रोजच वेगवेगळया शाळेतील मुलांचे सांस्कृतिक नृत्य सादरीकरण उपक्रम खूपच छान झाले.
पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत कार्यक्रमाचे योग्य नियोजन, लोकप्रतिनिधी, देणगीदार, व्याख्याते, रोजचे सत्कार मूर्ती त्यांची निवड, अप्रतिम स्टेज व्यवस्था, साउंड सिस्टीम, बैठक व्यवस्था, प्रसिद्धी, निमंत्रण व निरोप व्यवस्था, कलाकार, दिसणारे न दिसणारे कार्यकर्ते यांची कृतन्यता.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाने समारोप कायम स्वरूपी आठवणीत राहणार क्षण मनामध्ये साठविला. वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी सोहळा मध्ये आम्हाला सहभागी करून आम्ही डिझाइन केलेल्या वेबसाईट व सोशियल मीडिया कामाचे कौतुक म्हणून आमचा सत्कार केल्या बद्दल मनस्वी आभारी.
गणेश लोणारे, सिन्नर – नाशिक
माननीय श्रीकांत बेणी सर नमस्कार
गेले महिनाभर अथांग प्रयत्नाने सर्वात सुंदर असा व्याख्यानमालेचा
शतक महोत्सवी समारंभ आपल्या नेतृत्वाखाली अतिशय नियोजनबद्ध रीतीने, नवे नवे उच्चांक प्रस्थापित करत सुंदर पार पडला तुमचे अथक परिश्रम, मेहनत आणि अभ्यास या सगळ्यांनी आणि तुमच्या टीम वर्कने कार्यक्रम यशस्वी केला यासाठी तुमचे आणि तुमच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला आपला अभिमान आहे
Rekha Bhandare, Author and Poeter
मनःपुर्वक अभिनंदन
शतक महोत्सवी वर्षांची नाशिकची वसंत व्याख्यानमाला अतिउच्च उंचीला जावून , यशस्वी झाली सर्वांचे सहकार्य सहभाग यामुळे हे यश शक्य झाले, सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
कोणत्याही कार्याचा योजक महत्वाचा असतो , इथे या कार्यक्रमात तो मान श्रीकांतजी बेणी यांचा आहे. आमचे परम मित्र श्रीकांतजी बेणी, सौ संगीता बेणी वहिनी आणि त्यांची जिवाभावाचो टीम यांचे कौतुक व अभिनंदन करावे तेव्हढे थोडेच आहे.
श्रीकांतजी व सहकाऱ्यांनो मस्त रे मस्त ! तुम्ही इतिहास घडवला आहे. पालकमंत्री मा ना दादासाहेब भुसे , यांचे नेतृत्व ,मनपा , व मनपा सर्व यंत्रणा पोलीस आयुक्त व पोलीस खाते , वीज खाते , यांचे स्वच्छता व सुरक्षा , दैनंदिन यंत्रणा यांनी व्याख्यानमाला समितीला केलेले सहकार्य खूप मोलाचे आहे. नेते मंडळी ,खासदार ,आमदार देणगीदार , व्याख्याते , रोजचे सत्कार मूर्ती त्यांची निवड ,अप्रतिम स्टेज व्यवस्था ,साउंड सिस्टीम ,बैठक व्यवस्था , प्रसिद्धी , निमंत्रण व निरोप व्यवस्था , कलाकार , दिसणारे न दिसणारे कार्यकर्ते यांची सांगड झकास जमली आहे. मीडिया, वृत्तपत्र , सोशिअल मीडिया यांनी उत्तम साथ दिली व व्याख्यानमाला जगभर गेली , आधुनिक प्रसिद्धी समुग्रीचा पुरेपूर उपयोग करण्यात आला स्मरणिका सखोल तपशिल थक्क करणारा झाला ही स्मरणिका पुढील प्रत्येक महोत्सवासाठी मार्गदर्शक ठरेल महत्वाचे म्हणजे वरूण राजा प्रसन्न राहिला व उत्तम साथ मिळाली कोणताही अडथळा आला नाही मुळात शतक महोत्सव हीच खूप कौतुकाची व गौरवाची गोष्ट आहे आणि ती सोपी नाही , अवघड आहे त्यात असलेले , दिसलेले व न दिसलेले पण परिणाम करणारे अडथळे पार करून कार्य पुढे न्यायचे व यशस्वी करायचे हे कौतुकास पात्र आहे या यशस्वीतेमुळे आपले नाशिकचे नाव व मान यात यात नक्कीच मोठी भर पडली आहे.
तुमचे सर्वांचे कष्ट , परिश्रम शब्दात वर्णन करता येणार नाहीत इतके मोठे आहेत. पुन्हा एकदा सर्व सहभागी व सहकार्य यांच्यासह , व्याख्यानमाला समिती आणि श्रीकांतजी बेणी आणि त्यांना भक्कम साथ देणाऱ्या सौ संगीता वहिनी व सर्व जिवाभावाचे सहकारी ( याठिकाणी सर्व सहकाऱ्यांची नावे हृदयात आहेत ) यांचे मनःपुर्वक अभिनंदन !
सदैव सोबत आहोत.
अॅड.भानुदास शौचे , नाशिक – 8275273699
काय सुंदर रंगमंच,किती सुंदर flex, designs वा सर वा परवा आलो होतो अगदी छान….
श्रीकांत ने वसंत फुलवला …बहरला
Musician Sanjay Gite
यंदाची व्याख्यान माला ऑनलाईन पण उपलब्ध केल्यामुळे मला पुण्यात असूनही ऐकता येते आहे. शंभराव्या वर्षातला छान उपक्रम आहे. तुम्ही लिंक पाठवली म्हणून ते समजले एरवी माहिती नव्हते.
शुभदा गायधनी
आदरणीय श्रीकांत साहेब आपले कार्य खरोखर कौतुकास्पद आहे आपल्या सर्व उपक्रमशील वृत्तीला आमचा मानाचा मुजरा
Shahir Shivajirav Patil, Nagardevla, Jalgaon
बेनी साहेब
आपणास नमस्कार
आपण पुढे नेट असलेल्या आणि मनापासून चालवलेल्या या चळवळी साठी शुभेच्छा
Naresh Gite, IAS officer.
नाशिकच्या वैभवात अतिशय मोलाची भर घालणाऱ्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी उद्घाटन सोहळ्या त आपण अतिशय महत्त्वाची…. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे,सांभाळत आहात. याचा प्रत्येय काल उद्घाटन सोहळ्यात आला. स्टेजवर आपल्याला पाहून अभिमान वाटला.तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे नेत्र दीपक नृत्य कौशल्य पाहून अतिशय अभिमान वाटला. त्यामागे आपले कष्टही लक्षात आले. यावेळचा वसंत व्याख्यानमालेच्या सोहळ्याचे नियोजन करताना आपण आणि सन्माननीय बेणे साहेब यांनी अतिशय कौशल्यपूर्ण, नाविन्यपूर्ण तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नियोजन केलेले आहे आणि त्याची कार्यवाही काल अनुभवायला मिळाली. व्याख्याते ठरवतानाही आपण विविधता आणि जागतिक लेव्हल याचा सार्थ विचार केलेला आहे .हे विशेष उल्लेखनीय आहे. संदीप देशपांडे आपल्या बी.एड.चे विद्यार्थी आहेत. ते बोलायला लागल्यावर मी त्यांना ओळखले. भेट झाली नाही. त्यांनाही माझे धन्यवाद कळवा.आपल्याला आणि बेणी साहेबांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. बेनी साहेबांसारखा माणूस या वसंत व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आहेत हे खरोखर वसंत व्याख्यानमालेचे भाग्य आहे.ते तेथे असल्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय नेत्र दीपक भव्य दिव्य आणि ऐतिहासिक नोंद घेण्यासारखा होतो आहे. बेनी साहेब हे अतिशय कष्ट घेणारे आणि आधुनिक विचार करणारे व त्यानुसार कार्यवाही करणारे व्यक्तिमत्त्व आहे याची मला जाणीव आहे.त्यामुळेच मला त्यांचं मनापासून कौतुक आहे. मी आपल्या सगळ्यांनाच यशस्वी आयोजनासाठी आणि आपण घेतलेल्या कष्टासाठी हार्दिक धन्यवाद देतो.
प्राचार्य डॉ. बाफना मॅडम
https://twitter.com/drgodseravi1/status/1650704302376189954?s=48&t=Oi6yvxdkRA1XIH3SXhp-qQ
https://twitter.com/DrGodseRavi1/status/1657585916632875009?t=CCeFKFlM1ZCGbmi3cZjDZw&s=08
Dr. Ravi Godse
अभिमान वाटतो प्रिय श्रीकांतजी अशा श्रेष्ठ व महनीय परंपरेला तुम्ही पुढे नेत आहात
Principal Subhash Deshmukh
खूपच छान !
आपल्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम समन्वयाने मालेची प्रगती होत आहे .शताब्दीनिमित्त श्रीमान वि. कृ.वझे यांचे वरील व्याख्यान व्हावे ही नम्र ईच्छा !
Mukund Khoche Guruji
भव्य कार्यक्रमास शुभेच्छा..
Shrikant Shimpi, Professor, Mumbai
Very nice
Vivek Salunke, Advocate, Mumbai high court
एकदम भारी
Adv Bhanudas Shauche
अतिशय श्रेष्ठ व दर्जेदार व्याख्याते।
तुमचे खूप खूप अभिनंदन
Subhash Deshmukh, Chairman, Navjeevan education sanstha
कार्यक्रम भरगच्च व दर्जेदार आहे
Dr. Chandrakant Sanklecha
वाहवा ग्रेट
Anand Kshemkalyani
छान कार्यक्रम.. अभिनंदन
R G Kulkarni, Retired collector and kavi
ओवी वाचनीय फलकावर वसंत व्याख्यानमाला पत्रिकेचे सहर्ष स्वागत शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचे विषय दिग्गज वक्ते ..रसिक श्रोते नाशिककरांसाठी .
Dattatray Kothavde
Excellent programme
Sachin Etkar, Cultural sector worker, Pune
प्रिय श्री श्रीकांतजी,
वसंत व्याख्यानमाला या उपक्रमाचे अध्यक्ष म्हणुनआपले आणि आपणासह सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक
खूप खूप हार्दिक अभिनंदन. या उपक्रमातील प्रत्येक व्याख्यान मी ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याकरिता कार्यक्रमाची YouTube वर Link दिल्या बद्दल धन्यवाद!
Dyaneshwer Rajurkar, Retired Revenue Commissioner.
भरगच्च कार्यक्रम…
भव्यदिव्य आणि अनोखा होईल कार्यक्रम…
Kailas Patil, Writer and Actor
खूप चांगल्या वक्त्यांना बोलावलं आहे..
तुझे ह्यात निश्चितच योगदान आहे.
Satish Mohole
जबरदस्त कार्यक्रमांची आखणी
Rekha Bhandare, Kusumagraj Manas kanya
अतिशय सुंदर आयोजन. महीना भर हा यज्ञ चालवायचा. सोपं काम नाही. सलाम बेणीजी
Adv Nanasaheb Jadhav
श्रीकांत जी खूप सुंदर नियोजन खूप छान कार्यक्रम झाले यशस्वीरित्या नियोजन सर्व टीमचे अभिनंदन
Sonawane, Kamgar kalyan
सर नमस्कार…
वसंत व्याख्यानमाला शतक महोत्सव फार सुरेख सुरू आहे. एक नाशिककर ह्या नात्याने माझ्याही घरातील काही पिढ्यांच्या आठवणी व्याख्यानमालेशी जोडलेल्या आहेत. सगळे वक्ते एकापेक्षा एक सरस आहेत. संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन आणि आभार
तन्वी अमित
मोजक्या शब्दात उत्कृष्ठ संचलन उत्तम नियोजन करताय तुम्ही कष्टसाध्य कला सर्वांना नाही साधत तुम्हाला साधली
अभिनंदन तुमचे शुभेच्छा तुम्हाला!
Suresh Potdar
महाराष्ट्रातील शंभर वर्षाची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला आहे या शतक महोत्सवी वर्षा वर्षात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते हजेरी लावत आहेत त्यात अहिराणी वैभव असलेले एस. के. बापू यांनाही आमंत्रित केले आहे.ही बाब आपल्या दृष्टीने भूषणावह आहे 18 मे ला गुरुवारी संध्याकाळी गोदे काठी हजेरी लावून अहिराणी कार्यक्रमाचा नासिक स्थित मंडळींनी आस्वाद घ्यावा ही विनंती. बापूंना विश्व अहिराणी संमेलनाचा अध्यक्ष पदाचा मान मिळालाबापूंना विश्व अहिराणी संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.
आपला अशोक पाटील
आज माझा एवढा सन्मान केल्या बद्दल धन्यवाद, छान वाटलं आणि पुन्हा वसंत व्याख्यानमालेला यावसं वाटलं.
Smita Bhattacharya
नमस्कार सर
या वर्षी चा वसंत व्याख्यानमाला शताब्दी महोत्सव माझ्या व सर्व नाशिककर,व ज्या प्रेक्षकांनी यु-ट्युब व फेसबुक व डेन केबल वर वसंत व्याख्यानमालेचे कार्यक्रम बघितले अशा सर्वांच्या कायम स्मरणात राहीन.याचे सर्व श्रेय आपणास व आपल्या सहकार्यांना आहे.
११ वक्ते परदेशातुन आले होते.सर्व वक्ते ही चालती बोलती ज्ञानदायी विद्यापीठ आहेत.या सर्व वक्त्यांच्या भाषणातुन विविध विषयांचे ज्ञान मिळाले. प्रा.रोहीदास आरोटे,सौ.श्रिया जोशी,सौ.माधवी आमडेकर, श्री.महेश भागवत,कॅप्टन नीलम इंगळे,श्री.चेतन भागवत,श्री.भरत गिते,यांची भाषणे प्रेरणादायी होती.
या वर्षी आपण एक नवीन प्रथा सुरू केली.वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या शताब्दी महोत्सवात रोज एका शाळेचे नृत्याविष्कार झाले.तीस दिवसात शहर व जिल्ह्यातील विविध भागातील ३३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. ३० मे ला उत्सव नात्याचा व ३१ मे ला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमांनी वसंत व्याख्यानमाला रंगतदार झाली. मी ३१ दिवस वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमास उपस्थित होतो.
पुन:श्च आपले व आपल्या सहकाऱ्यांचे आभार व हार्दिक अभिनंदन.
अनंत दशपुत्रे
श्रीकांत, सर्व दिवसाचे कार्यक्रम उत्तम झाले. तुझ्या नियोजनआला सलाम
सूर्यकांत राहळकर
Congratulations Beniji for excellent management of Vasant vyakhanmala 2023.
Adv K K Ghuge
श्री बेणी सर – तुमचे आणि तुमच्या सहकाऱ्यांचे खूप कौतुक. सर्व कार्यक्रम उत्तम झाले. तुमच्या कष्टाचे चीज झाले. तुम्हांला खूप आरोग्य लाभो … खूप समाज सेवा होवो … वसंत असाच फुलुदे
Bagpacker Pravin Mankar
Excellent work, Sir.
You and Your TEAM is perfect in organising such events.
Hats off to you and your team.
Looking forward to have such many more events to come in future,
Dr. Rohidas Arote, Seul
श्री. बेणीजी व सहकारी, सार्वजनिक उपक्रमातील आपला सक्रिय सहभाग व भावनात्मक गुंतवणूक हेच वसंत व्याख्यानमाला
शताब्दी पर्वाचे खरे गमक ; जे प्रत्यक्ष राबतात तेच सदर यशाचे मानकरी ! …
ह्या संदेश माध्यमातून मी आपली पाठ थोपटतो शाबासकीसाठी!
रमेश कदम
Only one word is enough to greet our Dear Shrikant Beni…GREAT
Principal Subhash Deshmuk
हे अत्यंत महा कठीण शिव धनुष्य आपण समर्थपणे पेलून दाखविले आहे. या अभिनव आणि विशेष कार्यक्रमाची नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात ठळकपणे नोंद घेतली जाईल. आणि त्याबरोबर आपली ही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल. तुमचा मित्र म्हणून मला आपला सार्थ अभिमान वाटतो .आपले मनापासून हार्दिक अभिनंदन.
Principal Dr Shantaram Rayte
Thank you for the hospitality! I must appreciate your dedication and perseverance in holding a month long lecture series. It was meticulously planned and implemented.. A big thanks from me..
Dr Raman Gangakhedkar
सर्वांग सुंदर होतो यावर्षीची व्याख्यान माला..!
आपल्या सर्वांचे अभिनंदन.
R. G Kulkarni, Retired collector
वसंत व्याख्यान माला अतिशय यशस्वी रित्या पार पडली.सर्वच व्याख्याते हे तज्ञ होते.खूप छान वाटले.आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण छान होते. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेषतः आपले सर्वात जास्त योगदान होते,दरवर्षी असते. खूप खूप आभार.आणि मनपूर्वक अभिनंदन.
सौ.नीता आणि सतीश कोठेकर.
स्तुत्य उपक्रम सुरेख नियोजन
Chitrkar Atul Bhalerav