कार्यक्रम सूची २०२५

नाशिक महानगरपालिका, आयुक्त/प्रशासक, मनिषा खत्री यांच्या व्याख्यानाने वसंत व्याख्यानमालेच्या १०२ व्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ

जगभरातील १० विद्वान अभ्यासक तरुणांना करणार मार्गदर्शन.

वर्ष १०२ वे

वसंत व्याख्यानमाला, नाशिक.

प्रायोजक – सह्याद्री फार्म्स, मोहाडी
सहप्रायोजक – सपट निरावी
दि. १ मे ते ३१ मे २०२५, सायं ७:१५ वाजता
स्थळ – देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक – ३.

कार्यक्रम पत्रिका

गुरुवार दि. १ मे २०२५

भावपूर्ण आदरांजली
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, स्व. कृ. वि. वझे, कै. द. बा. टकले गुरुजी, कै. ना. ह. पाटील, स्व. भगवान कृष्ण पानसे

उदघाटन समारंभ पुष्प

उदघाटकीय वक्तेवक्ते – पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ, मुंबई
विषय – आत्मनिर्भर आरोग्य सेवा

शाहीर स्वप्नील डुंबरे व संच, सिन्नर (स्वरशंभु प्रबोधनात्मक शाहिरी मंच)

१०२ व्या ज्ञानयज्ञाचा शुभारंभ

शुभहस्ते – मनिषा खत्री, आयुक्त/प्रशासक, नाशिक महानगरपालिका

प्रमुख पाहुणे
श्री प्रवीण गेडाम, विभागीय महसूल आयुक्त, नाशिक
श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक
श्री जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक
श्री दत्तात्रय कराळे, विशेष पोलीस महानिरीक्षक
लीना बनसोड, आदिवासी विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक
श्री विक्रम देशमाने, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
शर्मिष्ठा वालावलकर-घारगे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
श्री उदय पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक
श्री सुब्रत मंडल, महाव्यवस्थापक (एओडी) हिंदुस्थान ऐरॉनॅटिक्स लि. ओझर
श्री विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री फार्म्स
श्री निखिल जोशी, चेअरमन, सपट, गृप
सहकार्य – डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठ, पिंपरी

शुक्रवार दि. २ मे २०२५

स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री सुरज राऊळ आणि सहकारी, नगरदेवळा, जि. जळगांव
विषय – रंग शाहिरी कलेचा

शनिवार दि. ३ मे २०२५

स्व. अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यान
वक्ते – ऍड. उज्ज्वलकुमार चव्हाण, स्वेच्छानिवृत्त आयकर अधिकारी, मुंबई
विषय – ये ED ED क्या है?

MSL कराओके क्लब, नाशिक – हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम

रविवार दि. ४ मे २०२५

स्व. डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यान
वक्ते – सिंहस्थ कुंभमेळा त्र्यंबकेश्वर-नाशिक, सन २०२७-२८ परिसंवाद
सहभाग – डॉ. प्रविण गेडाम व सहकारी अधिकारी

कलानंद कथ्थक नृत्य संस्था प्रस्तुत – भक्तीधारा (संचालिका – संजीवनी कुलकर्णी व डॉ. सुमुखी अथणी)

सोमवार दि. ५ मे २०२५

स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री सचिन व समीर अधिकारी, मोहरान, शहापूर
विषय – मोहाकडून मोहरानाकडे

रेखा महाजन प्रस्तुत -कवितेचे झाले गाणे

मंगळवार दि. ६ मे २०२५

स्व. ॲड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री चकोर बाविस्कर, न्यायाधीश, मुंबई
विषय – संतांचे समकालीनत्व

सरगम म्युजिक अकादमी प्रस्तुत – नंदकुमार देशपांडे निर्मित – गर्जतो मराठी (मऱ्हाटमोळी गाणी)

बुधवार दि. ७ मे २०२५

स्व. ॲड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री आकाश पाटील, अमेरिका
विषय – विचारांच्या क्षितिजापलीकडे : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी क्षमतांचा विस्तार

अफलातून म्युजिक ग्रुप आयोजित, हरिशभाई ठक्कर प्रस्तुत – मुरकी (मुकेश-रफी-किशोर हिट्स)
सहकार्य – के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक

गुरूवार दि. ८ मे २०२५

स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री शाहू पाटोळे, खामगांव, ता. जि. उस्मानाबाद
विषय – अन्नात कालविलेला धर्म आणि राजकारण

साज कराओके क्लब प्रस्तुत- Hits of 80’s

शुक्रवार दि. ९ मे २०२५

स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री वरुण सुखराज, लेखक, दिग्दर्शक, निर्माता
विषय – नवभारत : जाणिवेची उणीव

विवेक केळकर प्रस्तुत – गीत रामायण

शनिवार दि. १० मे २०२५

स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री निरंजन राजाध्यक्ष, कार्यकारी संपादक, अर्थ ग्लोबल, मुंबई
विषय – विकसित भारताच्या दिशेने वाटचाल : संधी आणि समस्या

बाबाज थिएटर आयोजित – रोटरी भक्ती महोत्सव – भजनगंगा – ग्यानेशकुमार वर्मा व सहकारी

रविवार दि. ११ मे २०२५

स्व. बाबुराव हाके स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री उद्धव आहिरे, चेअरमन, आनंद ऍग्रो उद्योग समूह, नाशिक
विषय – उद्यमशीलतेची पेरणी : यशाचे पीक

बाबाज थिएटर आयोजित – रोटरी भक्ती महोत्सव – अभंगवाणी – हृषिकेश शेलार व अश्विनी सरदेशमुख

सोमवार दि. १२ मे २०२५

स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यान
वक्ते – डॉ. मेधा ताडपत्रीकर, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ, पुणे
विषय – प्लास्टिक : वरदान आणि धोका

मेलडियस कराओके क्लब व उदय पाटील प्रस्तुत – Hits of 90’s

मंगळवार दि. १३ मे २०२५

स्व. मुळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री विष्णू मनोहर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ, नागपूर
विषय – आसे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण

युनिक स्टार ग्रुप प्रस्तुत – Hits Of राज कपूर
सहकार्य – KENSINGTON CLUB, नाशिक

बुधवार १४ मे २०२५

स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री अभय भंडारी, व्याख्याते विटा, जि. सांगली
विषय – श्री शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो ?

अक्षर काव्य समूह, नवी मुंबई प्रस्तुत – उत्सव कवितांचा ध्यास मराठीचा

गुरूवार दि १५ मे २०२५

स्व. द. गें. खैरनार (गुरुजी)स्मृती व्याख्यान
वक्ते – प्रा. मनोज बोरगांवकर, साहित्यिक, नांदेड
विषय – नदीचे स्वर आणि नाद : नदिष्ट

सिंफनी कराओके क्लब प्रस्तुत – Immortal Burman’s नमिता राजहंस व प्रशांत चंद्रात्रे

शुक्रवार दि. १६ मे २०२५

स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. छगन भुजबळ, येवला (नाशिक)
विषय – ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना

संतोष फासाटे प्रस्तुत – Evergreen Hits – अविनाश देवरुखकर, राजू पवार व सहकारी

शनिवार दि. १७ मे २०२५

स्व. लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री उन्मेष वाघ, चेअरमन, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथोरिटी, मुंबई
विषय – वाढवण बंदर – एक कल्पवृक्ष

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय प्रस्तुत – भक्तीगीतांचा कार्यक्रम – सादरकर्ते नितीन कुलकर्णी (माऊंटअबु)

रविवार १८ मे २०२५

स्व. रामनाथशेठ चांडक स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री माधव दाबके, आंतरराष्ट्रीय उद्योग व्यावसायिक तज्ञ, पुणे
विषय – पिरॅमिडच्या तळाशी नवोन्मेष आणि उद्योजकता निर्माण करा

जयंत चांदवडकर व वासुदेव वंजारी प्रस्तुत – सुरीला सफर

सोमवार दि. १९ मे २०२५

स्व. डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री आनंदसागर शिराळकर, जपान
विषय – AI युगात भाषेचं भविष्य : आपण तंत्रज्ञानाला शिकवणार की तंत्रज्ञान आपल्याला ?

स्वरांजली स्टुडिओ प्रस्तुत – गाणं मनामनातलं – हर्षद शिंत्रे, मिलिंद खाडे व सहकारी

मंगळवार दि. २० मे २०२५

स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री सुनील कुलकर्णी, जपान
विषय – जपान आणि भारत : उद्योजकतेची अंतर्दृष्टी आणि नोकरीच्या संधी

अंतरंग प्रस्तुत – बसंत बहार – सादरकर्ते दीप बक्षी व सहनृत्यकलाकार
सहकार्य – आनंद ऍग्रो उद्योग समूह, नाशिक

बुधवार दि. २१ मे २०२५

स्व. आण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. किरण पुरंदरे, पक्षी तज्ञ, पिरैदरी, ता. साकोला, जि. भंडारा
विषय – जंगलातील ४०० दिवस

मयूर टुकडीया प्रस्तुत – Bollywood Dhamaka – विशाल, रेणुका, प्रियांका

गुरूवार दि. २२ मे २०२५

स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. प्रमोद अत्तरदे, अमेरिका, सीईओ – एपेक्स डेफी लॅब्स
विषय – डिजिटल युगातील भविष्याची चाहूलः ब्लॅाक-चेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
(A.I.) या विषयांवरील विश्वासाची आणि त्या ज्ञानावरील मानवी बुद्धी च्या
प्रभुत्वाची पुनर्बांधणी कशी होईल???

रसिक सूर व अनघा धोडपकर प्रस्तुत -HITS OF 60’s & 70’s

शुक्रवार दि. २३ मे २०२५

स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री अझहर तंबुवाला, आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रमुख, सह्याद्री फार्म्स, मोहाडी
विषय – भारतीय फलोत्पादन आणि बाहेरील जग : एक दृष्टीकोन

सुसंस्कृती फाउंडेशन, नाशिक प्रस्तुत -राज कपूर हिट्स- धनंजय जैन व सहकारी
सहकार्य – श्री मंगल गृप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

शनिवार दि. २४ मे २०२५

स्व. शांतारामबापू वावरे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्रीमती बिल्किस मीर, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ज्युरी, जम्मूकाश्मीर
विषय – क्रीडा क्षेत्रातील वाटचाल आणि महिला खेळाडूंपुढील आव्हाने

आर. डी. कराओके क्लब व राज ढगे प्रस्तुत -SONGS FROM GOLDEN ERA-

रविवार दि. २५ मे २०२५

स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री अमित वाईकर, थायलँड
विषय – प्रवासी भारतीयाचे सामाजिक नेतृत्व

दवाई गंधर्व प्रस्तुत -ब्लॅक अँड व्हाईट हिट्स- नाशिकमधील प्रथितयश डॉक्टर्स

सोमवार दि. २६ मे २०२५

स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री इंद्रनील बंकापुरे, कोल्हापूर
विषय – मंदिरे कशी पाहावीत ?

सूर शारदा प्रस्तुत -सुपरहिट मेलडीज- घनश्याम पटेल व सहकारी

मंगळवार दि. २७ मे २०२५

स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री श्रीनिवास ठाणेदार काँग्रेसमन, (खासदार) मिशिगन, अमेरिका
विषय – ही श्रींची इच्छा

गोल्डन व्हॉईस प्रस्तुत – रफी के रंग – अजय बाहेती, वैष्णवी पगारे व सहकारी

बुधवार दि. २८ मे २०२५

स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री अनिल पाटील, मुंबई
विषय – स्वातंत्र्यसूर्य सावरकर आणि नाशिकमधील शतकृत्य

प्रसाद व वीणा गोखले प्रस्तुत -जयोस्तुते- स्वा. वि. दा. सावरकर लिखित गौरव गीते

गुरुवार दि. २९ मे २०२५

स्व. रमेश केंगे स्मृती व्याख्यान
वक्ते – कमांडर व्ही.एस.आगाशे, (निवृत्त – भारतीय नौदल)
विषय – ऑपरेशन सिंदूर! पुढे काय ?

कीर्ती कलामंदिर प्रस्तुत -कथक के रंग- सादरकर्ते आदिती पानसे व सहनृत्यांगना

शुक्रवार दि. ३० मे २०२५

स्व. अर्जूनसिंग बग्गा स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री सुनील देवधर, व्याख्याते पुणे
विषय – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

पॉडकास्ट मैफल – गीत गाता चल
सादरकर्ते – संगीतकार, गायक, संजय गीते, श्रावणी गीते, आरती शिरवाडकर, निलेश सोनवणे

शनिवार दि. ३१ मे २०२५

समारोप समारंभ
ग्रँड फिनाले
झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा – उत्सव झी मराठीचा

व्याख्यानमालेच्या www.vvmalanashik.org या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. ऑनलाईन ऐकायचे किंवा पहायचे असल्यास वसंत व्याख्यानमाला, नाशिक ह्याच्या सोशल मिडिया माध्यमांना भेट दया –

https://www.youtube.com/@vasantvyakhyanmalanashik955

https://www.facebook.com/vvmalanashik

https://www.instagram.com/vvmalanashik

Like, Share and subscribe करा.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्याख्यानमालेच्या यु ट्यूब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानमालेच्या www.vvmalanashik.org या वेबसाईटवर सदर व्याख्याने कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. तसेच स्थानिक केबल नेटवर्कद्वारे बालाजी TV चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरचित्रवाणीवर करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.
डेन केबल नेटवर्क चॅनेल नंबर-२८७
रेनबो केबल नेटवर्क चॅनेल नंबर-०१४
NXT डिजिटल केबल नेटवर्क चॅनेल नंबर-११५
तरी या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मोठ्या संख्येने आस्वाद घ्यावा.

स्वागतोत्सुक

कार्यकारी मंडळ, वसंत व्याख्यानमाला, नाशिक

वसंत व्याख्यानमाला सस्नेह निमंत्रण