डॉ. रवी गोडसे, चेतन भगत, मावजो, राजदीप सरदेसाई, ज्ञानेश्वर मुळॆ विचार मांडणार.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सादरीकरणाने समारोप होणार.
भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या ज्ञानयज्ञात जगाच्या विविध देशांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ११ नामवंत व्यक्तींबरोबरच ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त कोकणी साहित्यिक दामोदर मावजो, इंग्रजी भाषेत १३ कादंबऱ्या लिहून त्यापैकी ५ कादंबऱ्यांवर लोकप्रिय चित्रपट देणारे तरुण तडफदार लेखक चेतन भगत, पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आपले विचार मांडणार आहेत.
वसंत व्याख्यानमाला शताब्दी वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे बंदरे व खनिकर्म मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे आणि व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी आज एका पत्रकान्वये शताब्दी वर्ष कार्यक्रमाची घोषणा केली.
व्याख्यानमालेच्या उद्घाटन समारंभाकरिता केंद्रीय रस्ते , वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी आमंत्रणही स्वीकारले आहे. तथापि त्यांचा अधिकृत कार्यक्रम निश्चित व्हावयाचा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यस्ततेमुळे येऊ शकणार नसल्याचे कळविले असून कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील येण्याची शक्यता कमी आहे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेचा समारोप दि. ३१ मे रोजी सोनी मराठी या मनोरंजन वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष सादरीकरणाने होणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेते प्रसाद ओक, सुत्रसंचालिका प्राजक्ता माळी यांच्यासह अरुण कदम, समीर चौघुले यांच्यासह २५ कलावंत सहभागी होणार आहेत.
दि. १ मे ते ३१ मे २०२३ रोजी दररोज सायं. ७:०० वाजता गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे होणाऱ्या व्याख्यानमालेत जागतिक कीर्तीचे डॉ. रवी गोडसे, चंद्रशेखर चव्हाण, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. नितीन जोशी, सौ. विद्या जोशी हे अमेरिकेतील मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत. मूळचे कोपरगाव येथील रहिवासी असलेले फ्रान्स देशात उत्तुंग कामगिरी करणारे अमित केवल तसेच अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेले आणि आता साऊथ कोरिया येथील सेऊल विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रोहिदास आरोटे, स्वीडन येथील जागतिक कीर्तीचे विचारवंत इश्तीयाक अहमद, लंडन येथील शिक्षणतज्ज्ञ माधवी आमडेकर , संरक्षण साहित्याचे जर्मनी येथील पुरवठादार भरत गिते, जगातील उत्कृष्ट महिला वैमानिक कॅप्टन निलम इंगळे, पर्यावरण क्षेत्रात जगातील ९ देशांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रसाद सेवेकरी, दुबई येथे पेशवा हे लोकप्रिय शाकाहारी हॉटेल चालविणाऱ्या सौ. श्रिया जोशी हे वक्ते यंदाच्या व्याख्यानमालेचे आकर्षण असणार आहेत. नितीन जोशी व प्रसाद सेवेकरी मूळचे नाशिक येथील रहिवासी आहेत.
सन २०२२ चे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांचा नागरी सत्कार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नाशिकचे श्रध्दास्थान कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना १९८८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठी आणि कोकणी भाषा या एकमेकांच्या बहिणी म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे हा नागरी सत्कार समारंभ व्याख्यानमालेने आयोजित केला आहे.
महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका तसेच देणगीदार यांच्या सहकार्याने संपन्न होते असलेले व्याख्यानमालेचे शताब्दी वर्ष यशस्वी करण्यासाठी नागरी स्वागत समितीचे अध्यक्ष ना. दादाजी भुसे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेचे पदाधिकारी विजय हाके, सौ. उषा नवलनाथ तांबे, प्रा. संगिता राजेंद्र बाफणा, मनिष सानप, हेमंत देवरे, गणेश भोरे, ऍड. हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे, सुनिल गायकवाड, रुचिता ठाकूर, ऍड. कांतीलाल तातेड, विजय काकड, प्रा. कृष्णा शहाणे, संदीप नाटकर आदी परिश्रम घेत आहेत. व्याख्यानामालेच्या या कार्यक्रमांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि शताब्दी वर्ष यशस्वी करावे असे आवाहन मालेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेची महिनाभराची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे
दिनांक – १ मे ते ३१ मे २०२३
वेळ – दररोज सायं ७:०० वाजता
स्थळ – देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, पंचवटी, नाशिक – ३.
भावपूर्ण आदरांजली
न्या. महादेव गोविंद रानडे, स्व. कृ. वि. वझे,
कै. द. बा. टकले गुरुजी,
कै. ना. ह. पाटील, स्व. भगवान कृष्ण पानसे
उद्घाटकीय वक्ते – श्री. विक्रम हाजरा – (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक, संगितकार)
विषय – भक्ती संध्या
स्व. लोकशाहीर गजाभाऊ बेणी स्मृती व्याख्यान
वक्ते – डॉ गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्या नेतृत्वाखालील यशराज कलापथक, मुंबई यांचा कार्यक्रम (लोकशाहीर स्व. कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त)
विषय – रंग शाहिरीचे
स्व. अशोकराव देशमुख स्मृती व्याख्यान
वक्ते
१) प्रवीण मानकर – पांथस्थ / भटका कॉस्ट अकाउंटंट (बॅकपॅकिंग)
विषय – बॅग पॅकिंगचं भूत पाठीवर घेऊन जगभर फिरा
२) श्री. भूषण कापडणे यांच्या समावेत बहारदार सायंकाळ
विषय – मराठी हिंदी गीतांचे बहारदार मैफल
स्व. डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यान
वक्ते
१) सचिन बिरारी, जेनेरिक औषधांमधले तज्ञ
विषय – जेनेरिक औषधे
२) गझल संध्या – सूत्रसंचालक श्री. संतोष कांबळे
विषय – सहभाग – कवी काशिनाथ गवळी, सुरेंद्र टिपरे, नाना महाजन
स्व. अॅड. द. तु. जायभावे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) प्रा. रोहिदास आरोटे, साऊथ कोरिया
विषय – विज्ञानाशी जडले नाते
२) द गोल्डन स्टुडिओ प्रस्तुत ज्वेलस् ऑफ बर्मन्स्
सादरकर्ते – ज्ञानेश वर्मा, राजेश दाणी, अश्विनी सरदेसाई
स्व. शांताराम पाटील (गडाख) स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. प्रसाद सेवेकरी, पुणे
विषय – आपत्ती व्यवस्थापन, मानवतावाद आणि आपण
२) योगाचार्य डॉ.प्रज्ञा पाटील
विषय – योग एक जीवन शैली
स्व. अॅड. उत्तमराव ढिकले स्मृती व्याख्यान
वक्ते
१) डॉ. रमण गंगाखेडकर, नवी दिल्ली
विषय – भारताचा कोविड विरुद्धचा लढा
२) डाॅ. संजय वसंतराव पाटील, डायरेक्टर, हार्ट संजीवनी सेेंटर आणि नेक्टर दि कॅन्सर इन्स्टिट्यूट, नाशिक
विषय – सायटाेट्रान – कॅन्सरकरीता क्रांतीकारक उपचार पद्धत
सहकार्य – एसएनबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस् अॅण्ड रिसर्च सेंटर, नंदिहिल्स्, नाशिक
स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) ब्रम्हाकुमारी संतोष दिदी, माउंट अबू
विषय – आध्यात्मिक ज्ञानद्वारा जीवन मे सुख शांती की प्राप्ती
२) सुदर्शन पांडूरंग कुलथे – गिर्यारोहक, दुर्ग अभ्यासक
विषय – किल्ल्यांचा जिल्हा नाशिक
स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) इश्तियाक अहमद, स्वीडन ज्येष्ठ लेखक, पत्रकार, विचारवंत
विषय – जत्रेत हरविलेल्या दाेन भावांची कथा भारत-पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे सामाजिक-राजकीय मार्ग आणि त्यांनी एकमेकांशी कसे वागावे.
२) महेश शिरसाट, मंदिर, लेणी, शिल्प अभ्यासक
विषय – मंदिर शिल्पवैभव
सहकार्य – सचिन उषा विलास जाेशी, शिक्षण अभ्यासक इस्पॅलिअर प्रयाेगशील शाळा, नाशिक
स्व. प्रा. सुरेश मेणे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. सी. डी. मायी, कृषितज्ज्ञ, नागपूर
विषय – भविष्यातील भारतीय शेती
२) सुरमयी शाम
सादरकर्त्या – रसिका नातू – देसाई
सहकार्य – श्री. विलास शिंदे, सह्याद्री फार्म- सह्याद्री ऍग्रो
स्व. बाबुराव हाके स्मृती व्याख्यान
वक्ते
१) साै. श्रिया सचिन जाेशी, दुबई
विषय – प्रवास एका अन्नपूर्णेचा
२) कवी संमेलन
सूत्रसंचालक – डॉ विनोद गोरवाडकर
सहभाग – कवी विष्णू थोरे, सोमदत्त मुंजवाडकर, शैलेश चव्हाण
सहकार्य – अतुल राधाकिसन चांडक
स्व. निर्मलाताई दातार स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे
विषय – प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा
२) श्री. रविंद्र जोशी प्रस्तुत वेणूवंदना
विषय – बासरीवर मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम
स्व. डॉ. सुभाष सुराणा स्मृती व्याख्यान
वक्ते
१) डॉ. गौरी कानिटकर, अनुरूप विवाहसंस्था, पुणे
विषय – विवाह संस्थेचे बदलते स्वरूप
२) डॉ. राजेंद्र खैरे, डॉ. विनायक गोविलकर
श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक संकल्प समिती
विषय – सामाजिक दायित्व आणि सेवा
स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यान
वक्ते – श्री. शिवरत्न शेटे, शिवचरित्रकार सोलापूर
विषय – शिवशंभू : पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध
जगप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे, अहमदनगर – व्याख्यान सुरू असताना विविध चित्र रेखाटणार
स्व. द. गें खैरनार (गुरुजी) स्मृती व्याख्यान
वक्ते
श्री. दामोदर मावजो, गोवा
सन 2022 चा काेकणी भाषेतील साहित्याबद्दलचा ज्ञानपीठ
पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. दामोदर मावजाे ज्ञानेश्वर मुळेयांचा नागरी सत्कार
शुभहस्ते –
श्री. रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री, गाेवा राज्य
विषय – श्रेयस की प्रेयस
स्व. वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यान
वक्ते
१) सौ. माधवी आमडेकर, लंडन, ब्रिटन
विषय – विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य
२) श्री. मयुर हेमंतराव देशमुख आणि सहकारी
विषय – ज्ञानांजन आत्मप्रबोधनात्मक भारुड सेवा
स्व. लक्ष्मणराव (काका) तांबे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. महेश भागवत, अतिरिक्त पाेलीस महासंचालक (सीआयडी), तेलंगणा राज्य, हैदराबाद
विषय – स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक
२) प्रा.आनंद अत्रे
विषय – आनंदस्वर
स्व. राधाकिसन शेठ चांडक स्मृती व्याख्यान
वक्ते
१) ॲड. नितीन जोशी, अमेरिका यांची प्रकट मुलाखत मुलाखतकर्ती- अपर्णा वेलणकर
विषय – अमेरिकेतील मराठी समाज काल-आज-उद्या
२) हास्य कवी संमेलन
सूत्रसंचालक – एस. के. पाटील
सहभाग – कवी संदिप देशपांडे, भिला महाजन, बा. दो. पवार
सहकार्य – डॉ संजय वसंतराव पाटील
स्व. डाॅ. दाैलतराव आहेर स्मृती व्याख्यान
वक्ते
१) डॉ. रवी गोडसे, अमेरिका
विषय – वैद्यक शास्त्रातील विनोद
२) अफलातून ग्रुप प्रस्तुत
९० च्या दशकातील अविस्मरणीय गाणी
सादरकर्ते – मयुर टुकडीया, विशाल दाते, रेणुका बायस
सहकार्य – डॉ. व्हि.आर. काकतकर, डॉ. प्रदिप पवार
स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यान
वक्ते
१) कॅप्टन निलम इंगळे, एअर इंडिया पायलट, मुंबई
विषय – नभांगण
२) अनुभुती… स्वर तालाची
संकल्पना/दिग्दर्शन – नितीन वारे, नितीन पवार
सहकार्य – श्री. सुहास गिरी आणि कुटुंबिय
स्व. अण्णासाहेब वैशंपायन स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. अमित केवल, फ्रान्स
विषय – वाईन @ नाईन भारतीय वाईन उद्योगाला आकार देणारे ९ बदल
२) कस्तुरी वावरे प्रस्तुत “स्वर कस्तुरी”
विषय – मराठी गाण्यांचा एक सुरेल मैफल
सहकार्य – श्री. विक्रांत प्रकाश मते
स्व. मूळचंदभाई गाेठी स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. चेतन भगत, जगप्रसिद्ध लेखक, नवी दिल्ली
विषय – जीवनातील ध्येय गाठण्यासाठी युवकांपुढील आव्हाने
२) दुर्वांकुर नृत्य निकेतन (सौ. प्राजक्ता वर्टी-भट)
विषय – भरतनाट्यम नृत्य
सहकार्य – गोठी परिवार
स्व. कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यान
वक्ते
१) डॉ. चंद्रशेखर चव्हाण, अमेरिका
विषय – नेत्र आणि दृष्टी
२) श्री. प्रसाद गोखले
विषय – पद्मभूषण जगजीत सिंह यांच्या अविस्मरणीय गझल सादरीकरण
सहकार्य – डॉ. उन्मेश मराठे
स्व. शांतारामबापू वावरे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. भरत गिते, जर्मनी/पुणे
विषय – मेक इन इंडिया – पायाभूत सुविधा क्षेत्र
२) नृत्यांगण कथ्थक नृत्य संस्था, नाशिक
(किर्ती भवाळकर आणि शिष्या)
विषय – नृत्यार्पणम
स्व. माणेकलालजी भटेवरा स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार, नागपूर
विषय – महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागातील नागरीक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का ?
२) कवी संमेलन
सूत्र संचालक – प्रा. लक्ष्मण महाडिक
सहभाग – कवी राजेंद्र दिघे, जनार्दन देवरे, राजेश जाधव
स्व. स्मिता चंद्रकांत जाधव स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, नवी दिल्ली
विषय – देश विदेशातील अद्भुत अनुभव
२) नर्तन रंग
विषय – कथक भरतनाट्यम् नृत्याविष्कार
नायक सांस्कृतिक सेवा संस्था नासिक व सृजननाद इंडियन क्लासिकल आर्ट्स नासिक
स्व. श्रीमती निर्मला केशव गरुड स्मृती व्याख्यान
वक्ते
१) श्री. राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली
विषय – भारतातील सद्य: राजकीय स्थिती
२) श्री. प्रफुल्ल चव्हाण, नाशिक
विषय – चित्रकला आणि करिअर
स्व. डॉ. वि. म. गोगटे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) प्रा. सौ. धनश्री लेले, ठाणे
विषय – महाकवी सावरकर
२) “सागरा प्राण तळमळला”
बागेश्री / निर्मित (चारुदत्त दिक्षित निर्मित )
विषय – स्वा. सावरकरांच्या वैविध्यपूर्ण गीतांचा कार्यक्रम
स्व. रमेश केंगे स्मृती व्याख्यान
वक्ते
१) सौ. विद्या जोशी, अमेरिका
विषय – भारता बाहेरील भारत
२) मुग्धा सुधीर कुलकर्णी
गायिका व आर्ट डायरेक्टर
विषय – रंग राची – प्रेम रंगातले भक्ति काव्य
स्व. अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यान
झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा
विषय – सेलिब्रेटी कलाकारांसोबत संवाद सारेगमप गायकांची धमाल
सोनी मराठी टिव्ही वरील संपूर्ण जगात लोकप्रिय झालेल्या
महाराष्ट्राची हास्यजत्रा
या दर्शकप्रिय कार्यक्रमाचे प्रत्यक्ष सादरीकरण
(अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेते प्रसाद ओक, सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी यांच्यासह मालिकेतील सर्व अभिनेत्यांचा सहभाग)
व्याख्यानमालीच्या शताब्दी वर्षाच्या या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केबल टीव्हीवर साईलीला आध्यात्मिक चैनल वर आपण बघू शकाल त्याचबरोबर युट्युब आणि फेसबुक वर देखील आपण हे कार्यक्रम बघू शकाल त्यासाठी खालील प्रमाणे लिंक उपलब्ध आहेत.
युट्युब पेज
https://www.youtube.com/@vasantvyakhyanmalanashik955
फेसबुक पेज
https://www.facebook.com/vvmalanashik
इंस्टाग्राम पेज